देश व केंद्र पातळीवरील अनेक महानुभावांनी बँकेच्या शाखा उद्घाटन व कार्यक्रम प्रसंगी भेटी देवून मार्गदर्शन केलेले आहे

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा या केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र नसून, सामाजिक विकास आणि सहकार मूल्यांचा प्रसार करणारे केंद्र आहेत. याच शाखांच्या उद्घाटन प्रसंगी आणि विविध कार्यक्रमांदरम्यान देश व केंद्र पातळीवरील अनेक मान्यवर, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी विशेष भेटी देवून बँकेच्या कार्याची प्रशंसा केली आहे आणि मार्गदर्शनही केले आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीने बँकेच्या शाखांचे महत्त्व आणखी वाढले असून, त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे बँकेने आपली सेवा पातळी अधिक उंचावण्याचा सतत प्रयत्न केला आहे.


मा. ना. ॲड. आकाशजी फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा, यांचे शुभहस्ते दि. १८.०४.२०२५ रोजी चोहोट्टा बाजार शाखा इमारतीचे उदघाटन संपन्न झाले.

बँकेमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा शुभारंभ कार्यक्रम दि. ०६.०२.२०२५ मा. ना. डॉ. पंकजजी भोयर, सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेच्या मुख्य कचेरी, अकोला येथील प्रांगणात पार पडला या कार्यक्रमास अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार महर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे जन्म शताब्दी वर्षाचा समापन समारोह व सहकार मेळावा दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, मा. आमदार श्री. जयंतराव पाटील, मा. आमदार श्री. अनिलजी देशमुख, मा. कृषीशा शास्त्रज्ञ श्री. चारूदत्त मायी, यांचे उपस्थितीत पार पडला व मा. ना.श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन आणि महामार्ग, भारत सरकार यांची आभासी पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थिती होती.

मा. श्री. अजित कुंभार, जिल्हाधिकारी अकोला, यांनी दि. २१.०२.२०२४ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. सतिशजी मराठे, संचालक, सेंट्रल बोर्ड, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दि. ०३.०१.२०२४ रोजी बँकेला भेट दिली.

मा. निमा अरोरा, जिल्हाधिकारी अकोला यांनी दि. २१.०७.२०२३ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. जी. एस. रावत, मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी दि. १०.१२.२०२२ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. अनिलजी कवडे (भाप्रसे) सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक. १०.१२.२०२२ रोजी बँकेला भेट दिली.

मा. रश्मी दराड, मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी दिनांक. १३.१०.२०२२ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला यांनी दि.१४.०२.२०२० रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी गटसचिव यांचे आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणे करीता बँकेला भेट दिली.

मा. श्री. उदय शिरसाळकर, मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड यांनी दि.२७.११.२०१९ रोजी आयएमपीएस ॲट ब्रँच प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमा निमित्त बँकेला भेट दिली.

मा. संजय कापडणीस, आयुक्त, म.न.पा. अकोला यांनी दि. २.२.२०१९ रोजी बँकेस सदिच्छा भेट दिली.

मा. ना. सुमनेश जोशी, असि.डायरेक्टर (यु.आय.डी.ए.आय) यांनी बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲप शुभारंभा निमित्त बँकेला दि. २९.७.२०१८ रोजी भेट दिली.

मा. प्रिया मराठे, मराठी सिनेअभिनेत्री, यांनी बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲप शुभारंभा निमित्त बँकेला दि. २९.७.२०१८ रोजी भेट दिली.

मा. श्री. विजयराव झाडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी दि. १०.०२.२०१८ रोजी बँकेस भेट दिली.

मा. ना. श्री.सुभाषरावजी देशमुख साहेब, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी दि.०२.०२.२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वाशिम, यांनी बँकेच्या आधुनिक सुविधा भारत बिल्स पेमेंट सिस्टीम (बीबीपीस) च्या वाशिम येथील लोकार्पण समारंभा निमित्त दि.१४.०१.२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. ओमप्रकाश देशमुख (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, महाबीज यांनी बँकेच्या आधुनिक सुविधा भारत बिल्स पेमेंट सिस्टीम (बीबीपीस) च्या लोकार्पण समारंभा निमित्त दि.०७.०१.२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मराठी सिनेअभिनेता श्री. भारत गणेशपुरे व सिनेअभिनेत्री दिपाली जगताप यांनी दि.०६.१२.२०१७ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. कस्टर्न मायर, सदस्य के.एफ.डब्ल्यु. जर्मनी यांनी दि. १७.११.२०१७ रोजी बँकेला भेट दिली.

बँकेच्या डोअरस्टेप बँकिंग सुविधेच्या लोकार्पण समारंभा करीता मा. श्री. संजयभाऊ धोत्रे , खासदार अकोला व मा. श्री. आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी यांनी दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. श्रीकुमार तांबे, सदस्य, प्रशासकिय मंडळ, दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांनी दि. २५.०७.२०१६ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. मधुकर एस. चौधरी, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे, यांनी दि. ३०.०६.२०१६ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. चंद्रकांत दळवी (भा.प्र.से) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी दि. १६.०३.२०१६ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. यु. डी. शिरसाळकर, जनरज मॅनेजर, नाबार्ड महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी दि. ०४.०३.२०१६ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. एम. एल. सुखदेवे, अध्यक्ष प्रशासक मंडळ, दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक लि., मुंबई यांनी दि. २९ नोव्हेंबर २०१५ रोजी

मा. जी. श्रीकांथ, जिल्हाधिकारी अकोला, यांनी दि. २२.०६.२०१५ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.

मा. ना. डॉ. रणजित पाटील साहेब, पालक मंत्री, अकोला व वाशिम जिल्हा तथा राज्यमंत्री, गृह (शहरे) महाराष्ट्र राज्य, दिनांक १४.०६.२०१५ रोजी बँकेने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरा निमित्त बँकेला भेट दिली.

मा. अरूणजी शिंदे, जिल्हाधिकारी अकोला, यांनी दि. २३.०३.२०१५ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.

मा. डॉ. यु. एस. साहा, मुख्य सरव्यवस्थापक, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी २६.११.२०१४ रोजी "रूपे केसीसी बाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वर्कशॉप" निमित्त बँकेला भेट दिली.

मा. ॲड. देविदास पां. पाटील अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. ठाणे यांनी दि. १७.१०.२०१४ रोजी बँकेस भेट दिली.

मा. ललित जाधव उपमहाप्रबंधक (नाबार्ड) महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे यांनी 21 ऑगस्ट 2014 रोजी "डायरे्क्ट फायनान्स" वर्कशॉप निमीत्ताने बँकेस भेट दिली.

सहकार महर्षी कै. डॉ. वा. रा. उर्फ अण्णासाहेब कोरपे ह्यांचे पुर्णाकृती प्रेरणाशिल्पाचे अनावरण, रूपे केसीसी कार्ड वितरण व भव्य शेतकरी महामेळावा निमित्त दि. २१ ऑक्टोबर २०१३ रोजी मा. ना. शरदचंद्रजी पवार, कृषीमंत्री भारत सरकार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. ना. प्रफुल पटेल व इतर मान्यवर व्यक्ती यांचे उपस्थितीत पार पडला.

दि. १८.०९.२०१० रोजी बँकेचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न झाला. सदर सोहळयास मा. कृषीमंत्री, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सहकार मंत्री, व इतर मंत्री महोदय तद्वतच नाबार्डचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे सचिव व इतर अधिकारी यांची उपस्थिती लाभली

सन २००० मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री मा. ना. आर. आर. पाटील यांच्या शुभहस्ते तेल्हारा शाखा विस्तारीत ईमारतीचे उद्घाटन संपन्न झाले.

पद्मश्री शामरावजी कदम, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद्मविभुषण मा. बाळासाहेब विखे पाटील यांचे शुभहस्ते बँकेच्या आर्थिक पाठबळाने उभ्या राहीलेल्या जलसिंचन योजनेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

विधान सभेचे माजी सभापती मा.बाळासाहेब भारदे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री प्रो.राम मेघे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विष्णुअण्णा पाटील, मा. बापुरावजी देशमुख, माजी मंत्री बाबासाहेब केदार, तत्कालीन सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंदडा, मा. ना. अजितदादा पवार, मा. ना जयंत पाटील यांनीही बँकेला भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे.

सन १९९२ मध्ये जयहिंद शाखा अकोला चे उद्घाटन महराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मा. प्रल्हादभाऊ पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

सन १९९२ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा. ना. शांतारामजी पोटदुखे यांचे हस्ते नरसिंग मंदीर शाखा अकोट चे उद्घाटन संपन्न झाले.

विद्यमान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा महाराष्ट्राचे तत्कालीन सहकार मंत्री, मा. ना. विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते बार्शिटाकळी शाखेचा उद्घाटन समारंभ सन १९८७ साली संपन्न झाला.

सन १९८४ मध्ये बँकेचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री मा. डॉ. बलरामजी जाखड यांचे हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी खासदार मधुसूधन उर्फ नानासाहेब वैराळे उपस्थित होते.

भारताचे विद्यमान कृषीमंत्री व तत्कालिन महाराष्ट्र विधान सभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. शरदचंद्रजी पवार यांचे शुभहस्ते मंगरूळपीर शाखेचा उद्घाटन सोहळा सन सन १९८३ मध्ये संपन्न झाला.

सन १९७६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरावजी चव्हाण यांचे हस्ते बँकेच्या मुख्यकचेरी नविन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. पाच मजली असलेली व अकोल्यातील प्रथम लिफ्ट असलेली ही ईमारत जनतेची आकर्षण ठरली.

सन १९६९ मध्ये बँकेच्या हिरक महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे तत्कालीन गृहमंत्री मा. ना. यशवंतरावजी चव्हाण यांचे हस्ते व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. वसंतरावजी नाईक, केन्द्रीय कृषी राज्यमंत्री मा. अण्णासाहेब शिंदे, मा. ना पाटवेकर, मा. ना. बाबासाहेब सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

केनवड शाखेचे उदघाटन मा. ना. राजाराम बापू पाटील उपमंत्री मुलकी वन खाते, महाराष्ट्र राज्य, अनसिंग शाखेचे उद्घाटन मा. ना. दादासाहेब जगताप उपमंत्री ग्रामीण विकास व शेलुबाजार शाखेचे उद्घाटन मा. ना. बाळासाहेब भारदे सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते व , मा. ना बाळासाहेब देसाई यांच्या शुभहस्ते वाडेगाव शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.

सहकार चळवळीचे अध्वर्यू डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे हस्ते सन १९६७ मध्ये वाशिम शाखा नविन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

भारताचे तत्कालीन कृषीमंत्री, भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे हस्ते सन १९६३ मध्ये कामरगांव शाखेचे उद्घाटन करण्यात आले.