ग्रामीण आणि कृषी बँकिंग
ग्रामीण आणि कृषी बँकिंग :
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक आणि ग्रामीण ग्राहकांच्या आर्थिक विकासासाठी विश्वासार्ह भागीदार ठरली आहे. बँक ग्रामीण भागातील आर्थिक गरजांना समजून घेऊन शाश्वत शेती आणि ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देते.
कृषी व ग्रामीण बँकिंग सेवांचा समावेश:
शेतकऱ्यांचे स्वप्न, बँकेची बांधिलकी!
✅ शेतकरी कर्ज योजना पीककर्ज, शेती विकासासाठी टर्म लोन व सिंचन सुविधा.
✅ कृषी यंत्रे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य ट्रॅक्टर, पंपसेट, हार्वेस्टर व इतर यंत्रसामग्रीसाठी कर्ज सुविधा.
✅ ग्रामविकास निधी व बचत योजना ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्यासाठी विशेष ठेव योजना.
✅ शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC) शेतकऱ्यांसाठी त्वरित कर्जाची सुलभ सुविधा.
✅ लघुउद्योग व स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन.
✅ सिंचन, माती संरक्षण व पाणी व्यवस्थापन योजनेसाठी कर्ज शाश्वत शेतीसाठी आर्थिक आधार.
ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी बँक आपल्या ग्राहकांना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन देखील सातत्याने पुरवते.
अल्प मुदत पिक कर्ज
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकर्यांना प्राथमिक सेवा सहकारी संस्थांमार्फत शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (के.सी.सी.) योजनेअंतर्गत अल्पमुदती पीक कर्ज वितरण करते. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतक-यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी तसेच शेतीमधील विविध कामांसाठी गरजेप्रमाणे आणि वेळेवर व किफायतशीर पद्धतीने कर्ज पुरविण्यांचा आहे.
नविन कर्ज पुरवठयासाठी पात्रता व अटी
- सभासद गावातील संलग्न प्राथमिक वि.का. सहकारी संस्थेचा सभासद असावा व सभासदासवि.का. संस्थेमार्फत पीक कर्जाची मागणी व उचल करता येईल.
- सभासद कुठल्याही बॅन्केचा सहकारी संस्थेचा व एकत्र कुटूंबिय कर्जाचा थकबाकीदार नसावा.
- सभासदाने कर्जाची उचल करणेपूर्वी संस्थेस पुरेशा रकमेचे इकरार पत्रक करुन दिले पाहिजे व ७/१२ उताऱ्यावर कर्ज बोजाची नोंद करुन दिली पाहिजे.
- सभासदास प्राथ.वि.का.संस्थेच्या अटी व शर्तींची पूर्तता करुन दिल्यानंतर कर्ज वितरण केले जाते.
अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!