शाश्वत प्रगतीसाठी आर्थिक पाठबळ!

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या शेतकरी, व्यावसायिक आणि ग्रामीण ग्राहकांच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी विविध विकासात्मक कर्ज योजना सादर करते. या योजनांमधून शेती उत्पादनवाढ, पायाभूत सुविधा, दुग्धव्यवसाय, कृषियांत्रिकीकरण, जलसिंचन व विविध पूरक व्यवसायांसाठी आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेने नाविन्यपूर्ण आणि व्यवहार्य कर्ज पर्याय सुलभ अटींसह उपलब्ध करून दिले आहेत.

योजना समावेश:

💧 जलसिंचन कर्ज: विहीर, ट्यूबवेल, सबमर्सिबल पंप, ठिबक व तुषार संच, बोअरवेल, पाईपलाइन, जुनी विहीर दुरुस्ती यासाठी आर्थिक सहाय्य.
🚜 कृषियांत्रिकीकरण कर्ज: ट्रॅक्टर, ट्रेलर, औजारे, हार्वेस्टर, जेसीबी, चारचाकी वाहन, मळणीयंत्र, कडबाकटर, रोटाव्हेटर यासाठी कर्ज.
🐄 दुग्धव्यवसाय कर्ज: गाई/म्हशी खरेदी, दुग्धप्रकल्प उभारणीसाठी निधी.
✅ इतर पूरक व्यवसायासाठी कर्ज: दुचाकी वाहन, तारकुंपण, शेळीपालन, शेतघर, शौचालय बांधकाम, स्वयंसहायता समूह, पॅकहाऊस, शेडनेट, पॉलिहाऊस, कांदाचाळ इत्यादी.

योजनेची वैशिष्ट्ये:

✅ कमी व्याजदर
✅ सुलभ व पारदर्शक प्रक्रिया
✅ त्वरित मंजुरी व जलद वितरण
✅ परतफेडीसाठी लवचिक कालावधी
✅ व्यक्तिगत गरजेनुसार कर्ज मर्यादा

आपल्या प्रगतीसाठी बँक हमखास साथी! प्रत्येक गरजेवर नेमके वित्तीय समाधान.
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमच्यासोबत आहे!

अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!

संबंधित कर्ज प्रकाराची संपुर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या बटणांवर क्लिक करा.

जलसिंचन कृषियांत्रिकीकरण दुग्धव्यवसाय जे. एल. जी. ईतर कर्जे

जलसिंचन:

अ. क्र. जलसिंचन कर्जमर्यादा (रक्कम लाखात) मुदत व्याजदर (साधे)
१) नवीन विहीर+इले.मोटर / ऑइलइंजिन १.५० लाख ते ३.०० लाख १३ वर्ष ६.०० %
२) इले.मोटर / ऑइलइंजिन /सब.पंप ०.१३ लाख ते ०.६५ लाख ५ वर्ष ६.०० %
३) ट्यूबवेल + सब.पंप १.५० लाख ५ वर्ष ६.०० %
४) ठिबक संच १.०० लाख ७ वर्ष ६.०० %
५) जुनीविहीर दुरूस्ती ०.७५ लाख ५ वर्ष ६.०० %
६) पाईप लाइन १.५० लाख ५ वर्ष ६.०० %
७) बोअरवेल सब. पंप १.०० लाख ५ वर्ष ६.०० %

कृषियांत्रिकीकरण:

अ. क्र. कृषियांत्रिकीकरण कर्जमर्यादा (रक्कम लाखात) मुदत व्याजदर (साधे)
१) ट्रॅक्टर+ट्रेलर+औजारे कोटेशनच्या ८०% ६ वर्ष 11.00%
२) हार्वेस्टर कोटेशनच्या ८०% ५ वर्ष ११.०० %
३) जे. सी. बी. कोटेशनच्या ७५% ५ वर्ष ११.०० %
४) चारचाकी वाहन कोटेशनच्या ८०% ५ वर्ष ११.०० %
५) मळणीयंत्र कोटेशनच्या ८०% ५ वर्ष ११.०० %
६) कडबाकटर कोटेशनच्या ८०% ५ वर्ष ११.०० %
७) रोटाव्हेटर कोटेशनच्या ८०% ५ वर्ष ११.०० %

दुग्धव्यवसाय:

अ. क्र. दुग्धव्यवसाय कर्जमर्यादा (रक्कम लाखात) मुदत व्याजदर (साधे)
१) दुग्धव्यवसाय गाई / म्हशी १.३६ लाख ५ वर्ष ११.०० %
२) दुग्ध व्यवसाय प्रकल्प ७.०० लाख ५ वर्ष ११.०० %

जे. एल. जी.:

अ. क्र. जे. एल. जी. कर्ज कर्जमर्यादा मुदत व्याजदर
१) जे. एल. जी. कर्जप्रकारानुसार कर्जमागणी प्रकारानुसार (अल्प/ मध्यम/ दीर्घ) १२.५०%

ईतर कर्ज:

अ. क्र. ईतर कर्ज कर्जमर्यादा (रक्कम लाखात) मुदत व्याजदर (साधे)
१) तारकुंपण आवश्यक क्षेत्रानुसार ७ वर्ष ७.०० %
२) शेळीपालण १.५० लाख ते ४.०० लाख ५ वर्ष ११.०० %
३) एन.एच.बी./ एन.एच.एम. अंतर्गत पॅक हाऊस/शेडनेट/ पॉलि हाऊस/ कांदाचाळ ३.०० लाख ५ वर्ष ११.०० %
४) एम.एस.आर.एल.एम. अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह परतफेड क्षमतेनुसार १ वर्ष ११.०० %
अ. क्र. कर्ज प्रकार कर्जमर्यादा (रक्कम लाखात) मुदत व्याजदर साधे
१) जिल्हा ग्रामीण सुर्यघर कर्ज योजना ३.०० लाख ७ वर्ष ७.०० %