पारदर्शक आणि न्याय्य व्यवहाराची हमी!

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अकोला नेहमीच आपल्या ग्राहकांच्या विश्वासावर आधारित बँकिंग सेवा पुरवित आहे. सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी, बँकेचे सेवाशुल्क व कमिशनचे दर हे निश्चित व स्पष्टपणे ठरवलेले आहेत. बँक विविध आर्थिक व्यवहारांसाठी सेवाशुल्क आकारते, त्यामध्ये बचत खाते, चालू खाते, डिमांड ड्राफ्ट, RTGS/NEFT, IMPS, चेक बुक, लॉकर सेवा, खाते स्टेटमेंट, SMS सेवा व विविध कर्ज व्यवहार यांचा समावेश आहे.

बँकेचे सेवाशुल्क व कमिशनचे दर हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार आणि वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून निश्चित केले जातात.

✅ बँकेचे सर्व सेवाशुल्क आणि कमिशन दर ग्राहकांसाठी योग्य, पारदर्शक व समतोल राहतील याची विशेष खबरदारी घेतली जाते.
✅ दरवाढ केल्यास बँक RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्वसूचना देऊनच लागू करते.
✅ सर्व सेवा दरांचे तपशील बँकेच्या शाखांमध्ये व अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतात.

ग्राहकांचा विश्वास आणि आर्थिक सुरक्षितता हेच बँकेचे सर्वोच्च ध्येय!
आर. बी. आय. च्या नियमांचे पालन करत, बँकेचे सेवा शुल्क व कमिशन दर न्याय्य, प्रामाणिक व स्पष्ट ठेवलेले आहेत.

अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अकोला बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!

सेवाशुल्क व कमिशनचे दर:

बँकींग व्यवहारासंबंधी विविध सेवाकरीता घ्यावयाचे सुधारीत सेवाशुल्काचे दर खालील प्रमाणे (सेवाशुल्कावर जी.एस.टी. आकारणी वेगळी करण्यात येईल)
1 सेव्हींग ठेव खातेदाराकरीता खात्यामध्ये ठेवावयाची मासिक सरासरी किमान बाकी
  अ) सामान्य बचत ठेव खात्यात ठेवावयाची  मासिक सरासरी किमान बाकी ₹1000/-
  ब) चेकबुक धारका करीता खात्यात ठेवावयाची  मासिक सरासरी किमान बाकी ₹3000/-
2 सेव्हींग ठेव खात्यात  मासिक सरासरी किमान बाकीपेक्षा कमी बाकी ठेवल्यास असणारे शुल्क (चार्जेस)  
  अ) चेकबुक धारकाकरीता निशुल्क
  ब) चेकबुक नसणाऱ्या खातेदाराकरीता निशुल्क
3 चालु ठेव खातेदाराकरीता खात्यामध्ये ठेवावयाची  मासिक सरासरी किमान बाकी ₹3000/-
4 चालु ठेव खात्यात  मासिक सरासरी किमान बाकीपेक्षा कमी बाकी ठेवल्यास असणारे शुल्क (चार्जेस) निशुल्क
5 अकाउंट मेन्टेनन्स शुल्क -  
  अ) चेकबुक धारक सेव्हींग ठेव खाते करीता निशुल्क
  ब) चालू ठेव/सी.सी./ ओ.डी. कर्जाकरीता निशुल्क
  क) चेकबुक/ए.टी.एम.कार्ड सुविधा नसणाऱ्या सेव्हींग ठेव खाते करीता निशुल्क
6 फोलीओ चार्जेस (४० ट्रान्झेक्शन = १ फोलीओ)  
  अ) बचत ठेव खात्याकरीता निशुल्क
  ब) चालु ठेव खात्याकरीता निशुल्क
  क) सी.सी कर्ज खात्याकरीता निशुल्क
7 चेकबुक सुविधे करिता चार्जेस  
  अ) सेव्हींग ठेव करीता निशुल्क
  ब) चालु ठेवी करीता निशुल्क
  क) सी.सी./ ओ.डी. करीता निशुल्क
  ड) शासकीय / निमशासकीय कार्यालये निशुल्क
8 डिमांडड्राफ्टस खरेदी करणारासाठी कमिशन दर  (रोख व दुबेरजी ) निशुल्क
9 आर. टी. जी. एस. सुविधा सेवाशुल्क (शाखा स्तरावर व मोबाईल अँप द्वारे ) निशुल्क
10 एन.ई.एफ.टी. सुविधा सेवाशुल्क (शाखा स्तरावर व मोबाईल अँप द्वारे ) निशुल्क
11 आय.एम.पी.एस. सुविधा सेवाशुल्क (मोबाईल अँप द्वारे) निशुल्क
12 एस.एम.एस चार्जेस (तिमाही) प्राप्त एस.एम.एस चे संख्येनुसार
13 शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई अनुदान पिक विमा नुकसान भरपाई व ईतर तत्सम रकमांचे पेमेंट करणे  
  अ) ₹ 2000/- पर्यंतचे रकमेकरीता विनामुल्य
  ब) ₹2000/- पेक्षा जास्त रकमेकरीता विनामुल्य
  क)शासनातर्फे विविध योजना/ प्रस्ताव स्विकारणे / स्टेशनरी चार्जेस, विनामुल्य
  विमा प्रिमियमची रक्कम स्विकारणे ई.करीता (प्रती प्रस्ताव) विनामुल्य
14 खाते नसलेल्या इतर शाखेमधून पासबुक भरून देणे, खात्यासंबंधी दाखला देणे नि:शुल्क
15 ए.टी.एम कार्ड पुरविणे (प्रथम कार्ड) ₹ 100/-
16 ए.टी.एम कार्ड पुरविणे (द्वितीय कार्ड नंतर प्रत्येक कार्डला प्रती कार्ड) ₹ 200/-
17 ए.टी.एम कार्ड वार्षिक देखभाल शुल्क ₹ 100/-
18 ए.टी.एम ट्रान्झेक्शन चार्जेस (आपल्या बँकेच्या ए.टी.एम व्यतिरिक्त इतर ए.टी.एम वरून १ महिन्यात ५ पेक्षा जास्तवेळा फायनान्शिअल किंवा नॉन फायनान्शिअल व्यवहार केल्यास प्रती ट्रान्झेक्शन चार्ज लागेल)  
  अ) ए.टी.एम फायनान्शिअल ट्रान्झेक्शन चार्जेस ₹ 19/-
  ब) ए.टी.एम नॉन फायनान्शिअल ट्रान्झेक्शन चार्जेस ₹ 7/-
19 पासबुक हरविल्यास /गहाळ झाल्यास दुय्यम प्रतीकरीता ₹100/-
20 खाते उतारा डूप्लिकेट प्रत, प्रती लिफ ₹50/-
21 कागदपत्राच्या प्रमाणीत सत्यप्रती पुरविणे प्रती पेज ₹50/-
22 चेक चे स्टॉप पेमेंट प्रती चेक ₹100/-
23 डुप्लीकेट डि.डि. देणे / डि.डि. चे रिव्हॅलीडेशन करणे / डि.डि. रद्द करणे प्रती  डि.डि. ₹200/-
24 डुप्लीकेट मुदती ठेव पावती करीता प्रती पावती ₹100/-
25 सहा महिन्याचे आंत खाते बंद केल्यास  
  अ) चालु ठेव ₹300/-
  ब) सेव्हींग ठेव ₹300/-
26 चेकबुक हरविल्यास / सरेंडर केल्यास (कोऱ्या व इश्यु केलेल्या चेक्सकरीता) प्रती चेक लिफ ₹5 /- (जास्तीत जास्त ₹ 200/-)
27 चेक रिटर्न चार्जेस  
  अ) इनवर्ड चेक्स करीता प्रती चेक ₹ 500/-
  ब) आऊटवर्ड चेक्स करीता प्रती चेक ₹ 50/-
28 सिग्नेचर व्हेरीफीकेशन चार्जेस (शाखा स्तरावर) ₹ 100 /-
29 मॅन्डेट चार्जेस
  अ) इनवर्ड मॅन्डेट एक्सेप्टन्स चार्जेस ₹ 50/-
  ब) इनवर्ड मॅन्डेट रिटर्न चार्जेस ₹ 200/-
30 स्टँन्डींग इंस्ट्रक्शन अनादर शुल्क ₹ 200/-