फसवणूक टाळण्याकरिता आपला ए.टी.एम. कार्ड नंबर/ पिन / खाते क्रमांक / OTP कोणालाही सांगू नका. बँक अथवा आमचे कोणतेही प्रतींनिधी आपणास याबाबत विचारणा करत नाही.

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

116 वर्षाच्या सेवेचा वारसा असलेली संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि आताची दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., ही 116 वर्षाच्या सेवेचा वारसा लाभलेली, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेचे अगदी आरंभीचे नांव दि अकोला सेंट्रल अर्बन बँक लि.,अकोला हे होते. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा. मि. हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेब्रुवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.

आज रोजी बँकेच्या 107 शाखा व 5 विस्तार कक्ष कार्यरत आहेत.


मोबाईल बँकिंग

स्मार्टफोनद्वारे बँकिंग सेवा मिळविण्याची सोय, जसे की पैसे पाठवणे, बिल भरणे, खात्याचे तपशील पाहणे इत्यादी.

वैयक्तिक बँकिंग

वैयक्तिक आर्थिक गरजांसाठी बँकिंग सेवा, जसे बचत खाती, कर्ज, डेबिट कार्ड, आणि गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत.

ग्रामीण आणि कृषी बँकिंग

ग्रामीण भागातील लोक आणि शेतकऱ्यांसाठी विशेषतः शेती आणि संबंधित क्रियाकलापांसाठी आर्थिक सेवा, कर्जे , ठेवी आणि इतर बँकिंग सेवा.

आमच्या सेवा

NEFT आणि RTGS, IMPS, BBPS, CTS, DBT, ACH, AEPS, M-POS, C-KYC, PFMS, Door Step Banking, मोबाईल बँकिंग.

  • ठेविवरील व्याजदर
  • कर्जावरील व्याजदर
  • सेवा शुल्क व कमिशनचे दर
  • जेष्ठ नागरीकाकरीता विशेष दर
  • शेती कर्ज योजना
  • विकासात्मक कर्ज योजना
  • बिगरशेती कर्ज योजना
  • ए.टी.एम. व लॉकर सुविधा
  • शेतकऱ्यांच्या करीता सुविधा
  • बँकेच्या विविध सुविधा
अधिक माहिती

मोबाईल बँकिंग

"Akola DCC m-Pay" स्मार्ट फोन ग्राहकांसाठी अनेक वैशिष्ट्यांसह सोयीस्कर, विश्वासनिय आणि सुरक्षित मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन.

मोबाईल बँकिंग वैशिष्ट्ये:

  • आपल्या खात्याचा तपशील बघण्याचा सोयीचा मार्ग.
  • यूटिलिटि बिल पेमेंट सुविधा.
  • जिल्हा बँकेअंतर्गत रक्कम ट्रान्सफर सुविधा
  • IMPS सुविधा.
  • आर. टी. जी.एस/ एन.ई.एफ.टी. सुविधा
  • कार्डची लिमिट कमी करणे / वाढविण्याची सुविधा
  • ATM कार्ड तात्पुरते किवा कायमचे बंद करण्याची सुविधा
  • Akola DCC m-Pay सेवा सर्व प्रकारच्या स्मार्ट फोन करिता २४/७ उपलब्ध

गूगल प्ले स्टोअर वरून "अकोला डीसीसी एम-पे" डाउनलोड करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.

Akola DCC m-Pay